परमवीर सिंह यांची पोलखोल : BARC तर्फे 'रिपब्लिक'ला क्लिनचीट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |
Republic tv_1  
 

TRP घोटाळा प्रकरणाची सीबीआय चौकशी करा! 

 
 
नवी दिल्ली : कथित टीआरपी गैरव्यवहार प्रकरणात देशातील अग्रगण्य वृत्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या रिपब्लिक टिव्ही चॅनलवर टीआरपी घोटाळ्याचा आरोप लावणाऱ्या मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांची पोलखोल करणारे वृत्त रिपब्लिक टीव्हीने दिले आहे. 'ब्रॉडकास्ट ऑडीयन्स रिसर्च काउंसिल ऑफ इंडिया' (BARC) संस्थेतर्फे आलेल्या ई-मेलचा हवाला देत रिपल्बिक टीव्हीने आता मुंबई पोलीस आयुक्तांना घेरले आहे. कथित टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्ही ऐवजी इंडिया टुडे या चॅनलचे नाव असून या गैरव्यवहारात रिपब्लिक टिव्हीचा काडीमात्र, संबंध नसल्याचे स्पष्टीकरण BARC ने दिले आहे.
 
 
 
याच मुद्द्यावरून आता रिपब्लिक टीव्हीतर्फे मुंबई पोलीस आयुक्तांना घेरण्यात आले आहे. वर्दी चढवून एखाद्या स्वतंत्र्य माध्यम संस्थेबद्दल बिनबुडाचे आरोप केल्याप्रकरणी परमवीर सिंह यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आयुक्तांवर कारवाई करणार का, असा सवाल आता विचारला जात आहे. तसेच या कथित गैरव्यवहारात आयुक्तांनी आरोप केल्यावर देशभरातील प्रसिद्धी माध्यमांनी ज्या प्रकारे रिपल्बलिक टीव्हीवर हल्ला चढवला होता, त्याबद्दल माध्यमे माफी मागणार का, असा प्रश्नही रिपल्बिकतर्फे विचारण्यात आला आहे.
 
 
 
१७ ऑक्टोबर २०२० रोजी पाठवण्यात आलेल्या ईमेल्द्वारे BARCने याबद्दल म्हटले आहे की, ‘ARG Outlier Media Pvt Ltd’ 'रिपब्लिक टीव्ही' या संस्थेविरोधात संबंधित प्रकरणात आरोप झाले असते किंवा तशी कारवाई सुरू झाली असती तर ‘BARC India’ने संबंधित पुराव्यांच्या आधारे आपल्याशी संपर्क केला असते. या गोष्टी BARCने सार्वजनिक स्वरुपात मांडत नसल्याने आम्ही हे ई-मेल सार्वजनिक करत आहोत, असे संपादक अर्णब गोस्वामी यांनी सांगितले.
 
 
 
रिपब्लिक टिव्हीचे म्हणणे काय ?
 
 
BARC ने आम्हाला पाठवलेल्या कुठल्याही पत्रात, ईमेल्समध्ये आमच्या कुठल्याही कंपनीविरोधात गैरव्यवहाराचे आरोप नसल्याचे म्हटले आहे.



मुंबई पोलीस कमिश्नर परमवीर सिंह यांच्याद्वारे सुरू असलेल्या फेक न्यूज कॅम्पेन आता संपले आहे.



‘रिपब्लिक’चे सीईओ विकास खानचंदानी यांना BARC तर्फे पाठवण्यात आलेल्या पत्रात याबद्दल स्पष्ट सांगितले आहे की, मुंबई पोलीस आयुक्तांच्या टीआरपी गैरव्यवहार प्रकरणी आरोपांमुळे सर्व माध्यमांवर ही फेक न्यूज चालवली जात होती. 



ईमेलमध्ये म्हटले आहे की, रिपब्लिक टीव्ही विरोधात कुठल्याही प्रकारची तक्रार आढळली नाही. परमवीर सिंह यांनी खोटे आरोप केले त्यांना राजकीय किनार होती.
 
 
आम्ही जनतेच्या आवाजाला प्रार्थमिकता दिल्याने आम्ही देशातील अग्रगण्य चॅनल्सपैकी एक आहोत. आम्ही या प्रकरणी कायदेशीर लढाई लढत राहू.



नियम आणि कायद्यांच्या तसेच पत्रकारितेच्या सिद्धांताचे पालन करत आपले काम करत राहणार आहोत.

 
 
 
@@AUTHORINFO_V1@@