हा महाराष्ट्र आहे इथे मराठीच हवी ! : दुकानदारांना 'मनसे स्टाईल' दम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |
Raj Thackeray_1 &nbs




बँकांचेही व्यवहार मराठीत करणार : आंदोलकांचा निर्धार


कल्याण : महाराष्ट्रात राहून मराठी भाषेची गळचेपी करीत दुकानाची पाटी मराठी व्यतिरिक्त इतर भाषेत लावणाऱ्या दुकानदारांना सज्जड दम भरण्याचे काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण पूर्वेतील उपशहरध्याक्ष योगेश गव्हाणे यांनी केले आहे. नागरिकांना आणि सत्ताधा:यांना मराठी भाषेचा विसर पडला आहे. मराठी माणसांच्या नावावर हे सत्ताधारी सत्ता उपभोगत असतात. 


सत्तेवर आल्यावर त्यांना मराठी भाषेचा विसर पडला आहे. हे दुकानदार महाराष्ट्रात राहतात पण इमान आपल्या मातृभाषेशी ठेवतात. त्यांच्या दुकानावरील पाटीवर ही त्यांच्या मातृभाषेत नावे लिहिलेली दिसून येतात. ते महाराष्ट्रात व्यवसाय करून आपले पोट भरत असतील तर त्यांनी मराठी भाषेचा देखील मान राखला पाहिजे, या उद्देशाने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे.



मनसेतर्फे गेल्या दोन दिवसांत साठ दुकानदारांना दुकानाची पाटी मराठी भाषेत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनसेतर्फे ही मोहिम पुढे ही सुरूच राहणार आहे. दुकानदारानंतर बँकेतील व्यवहार मराठी भाषेत व्हावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे गव्हाणे यांनी सांगितले. या मोहिमेत त्यांच्यासोबत गणोश सोनावणो, जितेंद्र वाघचौरे, महेंद्र कुंदे आदी कार्यकर्ता उपस्थित होते.





@@AUTHORINFO_V1@@