कल्याणमधील ज्येष्ठ साहित्यिक किरण जोगळेकर यांचे निधन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-Oct-2020
Total Views |

joglekar_1  H x



कल्याण :
गझलपासून आध्यात्मिक निरूपण अश्या सर्वच प्रातांत मुशाफिरी करणारे कल्याणमधील ज्येष्ठ साहित्यिक किरण जोगळेकर (वय ७२ वर्ष) यांचे रविवारी हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

जोगळेकर यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा मधुमेह आटोक्यात येत नसल्याने त्यांनी आज अखरेचा श्वास घेतला. ऑगस्टमध्ये त्यांच्या पत्नीचे कोरोनाने निधन झाले होते. जोगळेकर यांची ७५पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात गझल संग्रह, काव्यसंग्रह, व्यक्तीदर्शन आणि आध्यात्मीक लेख यांचा समावेश आहे. त्यांनी काव्यकिरण मंडळाची स्थापना केली होती. या मंडळातर्फे त्यांनी अनेक काव्य कार्यक्रम केले.

विविध साहित्य, कवी संमेलनाचे अध्यक्ष, परिक्षक, कार्यशाळा संचालक म्हणून त्यांचे योगदान आहे. कल्याणातील अनेक साहित्य संमेलनाच्या नियोजनात त्यांचा सहभाग होता. ते मसाप कल्याण शाखेचे उपाध्यक्ष होते. ते एक उत्तम प्रवचनकार होते. चातुर्मासात विविध गावी ते सप्ताह ही करीत असत. वृत्तपत्रत ही त्यांनी आध्यात्मिक लेखमाला लिहीली होती. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या जाण्याने साहित्यीक आणि अध्यात्मिक विश्वाचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा ऋषीकेश हा आहे.
@@AUTHORINFO_V1@@