सिलेंडर डिलिव्हीरी पद्धत बदलणार : ओटीपी असेल आवश्यक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Oct-2020
Total Views |
Gas_1  H x W: 0

१ नोव्हेंबरपासून नवी नियमावली लागू होण्याची शक्यता

नवी दिल्ली : एक नोव्हेंबरपासून देशभरात घरगुती गॅस सिलेंडरबद्दल नियमावली बदलणार आहे. पुढील महिन्यात गॅस सिलेंडरची होम डिलिव्हरी पद्धत बदलणार आहे. यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) द्यावा लागणार आहे. गॅस सिलिंडरची चोरी खण्यासाठी ही नियमावली बदलली जाणार आहे. ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी आता डिविव्हरी ऑथेंटीकेशन कोड सिस्टम सुरू केली जाणार आहे. सुरुवातीला शंभर स्मार्ट सिटीमध्ये लागू केली जाणार आहे. त्यानंतर अन्य शहरांमध्ये ही व्यवस्था लागू केली जाईल. जयपूरमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
तरच मिळणार गॅस सिलेंडर
केवळ बुकींग केल्यावरच आता सिलिंडरची मिळणार नाही, त्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी दिला जाईल. तो कोड डिलिव्हरी बॉयला द्यावा लागणार आहे. तरच डीलिव्हरी मिळणे शक्य होणार आहे. ग्राहकाकडे नोंदणीकृत क्रमांक नसेल तर त्याला अँपद्वारे तो अपडेट करून घ्यावा लागणार आहे. क्रमांक अपडेट झाल्यानंतरच कोड मिळण्यास सुरुवात होणार आहे.
 
काय येऊ शकतात अडचणी
दरम्यान, ग्राहकांनी या व्यवस्थेबद्दल असुविधा होण्याची शक्यता आहे. पेट्रोलियम कंपन्यांसह मोबाईल क्रमांक अपडेट नसलेल्यांना किंवा चुकीचा क्रमांक अपडेट केलेल्यांना याचा फटका बसू शकतो. चुकीच्या माहितीमुळे त्यांची डिलिव्हरी रोखली जाऊ शकते. व्यावसायिक वापरासाठी घेण्यात येणाऱ्या सिलेंडरवर ही सुविधा लागू नसेल. योग्य व्यक्तीलाच सिलिंडर पोहोचला आहे किंवा नाही याबद्दल सुनिश्चितता म्हणून ही यंत्रणा फायदेशीर ठरणार आहे.
 
सबसिडी सुविधा
सध्या सरकार प्रत्येक घरासाठी १४.२ किलोग्रामच्या १२ सिलेंडरसाठी सबसिडी प्रदान करते. त्यापेक्षा जास्त सिलेंडर खरेदीसाठी बाजारभावात दिले जाऊ शकतात. दरमहिन्याला गॅस सिलेंडरचे दर बदलत असतात. सिलेंडरची सरासरी किंमत आंतरराष्ट्रीय प्रमाण आणि विदेशी नियमन आणि कर यांच्यानुसार ठरत असतात.
@@AUTHORINFO_V1@@