नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना योग्य : दा.कृ. सोमण

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020
Total Views |

navratri pujan_1 &nb


मुंबई :
कोरोना काळात नवरात्रोत्सव आला आहे. दुर्गा म्हणजे शक्ती,तेव्हा, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर,आरोग्यही उत्तम राहते.म्हणुन यावर्षी आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल. शारदीय नवरात्रास आजपासून (दि.१७ ऑक्टो.) सुरूवात होत असुन नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना शनिवारी सूर्योदयापासून दुपारी २ वाजेपर्यंत कधीही करावी.असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.



नवरात्रातील पूजा ही आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. या सुमारास शेतातील धान्य घरात येत असते. निर्मिती आणि ९ या संख्येचं अतूट नातं आहे. बी जमिनीत पेरले की नऊ दिवसांनी अंकुरते.गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येते.नऊ ही सर्वात मोठी संख्या असल्याने ९ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. तेव्हा,नऊ दिवस पूजा करून दररोज एक याप्रमाणे माळा बांधतात. घटामध्ये मातीत धान्य पेरतात. तसेच, अखंड दीप तेवत ठेवला जातो. यावर्षी नऊ दिवसात एकाही तिथीची क्षयवृध्दी न झाल्यामुळे नवरात्र सलग नऊ दिवस आले आहेत. यावर्षी तर,कोरोना लढाई काळात नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आला आहे.दुर्गा म्हणजेच शक्ती. माणसांत प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आरोग्य चांगले राहते म्हणून यावर्षी नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल.असे सोमण यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही गर्दी न करता शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि दक्षता यांचे पालन करावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
@@AUTHORINFO_V1@@