'गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Oct-2020
Total Views |

yashomati thakur_1 &



मुंबई :
पोलिस कॉन्सेटबलवर हात उगारल्याप्रकरणी महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांना ३ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आलीय. अमरावती जिल्हा न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता भाजप नेत्यांनी यशोमती ठाकूर यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.


भाजपच्या राज्य उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुर यांच्यावर ट्विटच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. “गाडी का अडवली? म्हणून पोलिसांना मारहाण केलेल्या विद्यमान मंत्री यशोमती ठाकुर यांच्यावरील गुन्हा न्यायालयात सिद्ध झाला. खरं तर मागणी करायच्या आधीच नैतिक जबाबदारी म्हणून राजीनामा द्यायला हवा होता पण ‘खिसे गरम’ करायचं गणित तुम्हाला थोडी स्वस्थ बसू देत असेल?, असा निशाणा चित्रा वाघ यांनी यशोमती ठाकुर यांच्यावर साधला आहे.




तर दुसरीकडे आज अमरावतीत श्रमिक पत्रकार भवनात भाजपने पत्रकार परिषद घेत यशोमती ठाकुर यांच्या राजीनाम्याची मागणी करत त्यांच्यावर हल्लाबोल केला.न्यायालयाने गुन्ह्यात दोषी ठरवलेल्या मंत्र्यांला मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे गुंड प्रवृत्तीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली आहे.


“यशोमती ठाकूर यांना सत्तेचा माज आहे. त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. जर न्यायालयाने त्यांना दोषी ठरवलं आहे तर त्यांनी स्वत:च या प्रकरणात आपली नातिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यायला हवा होता. मात्र तो त्यांनी दिलेला नाही. म्हणूनच भाजप आज त्यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात आंदोलन करेल, असं शिवराय कुलकर्णी म्हणाले. अमरावतीत यशोमती ठाकुर यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली असून आता भाजप विरुद्ध यशोमती ठाकूर हा वाद आता चांगलाच पेटला आहे.


काय आहे प्रकरण?


यशोमती ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ पोलिसाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता. ही घटना २४ मार्च २०१२रोजी घडली होती. पोलीस कॉन्स्टेबल उल्हास रौराळे यांच्याशी हुज्जत आणि मारण्याचा प्रयत्न करणे, शासकीय कामात अडथळा आणणे या प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोप सिद्ध झाल्याने यशोमती ठाकूर यांना तीन महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यांचा कार चालक आणि सोबतचे दोन कार्यकर्ते देखील दोषी आढळले आहेत. फितूर होऊन साक्ष देणारा एक पोलिसही शिक्षेस पात्र ठरला आहे.

@@AUTHORINFO_V1@@