'असमर्थ ठरल्यानंतर काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

amruta fadnavis_1 &n



'वाह प्रशासन'! दारूची दुकान उघडी मंदिरं मात्र डेंजर झोन


मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे बंद आहेत. राज्यभरातून मंदिरे उघडण्यासाठी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून अमृता फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. बार आणि दारूची दुकानं सताड उघडी असताना मंदिरं मात्र डेंजर झोन आहेत का? असा सवाल अमृता फडणवीस यांनी केला आहे. 'वाह प्रशासन' म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता अमृता फडणवीस यांनी निशाणा साधला आहे.



असमर्थ ठरल्यानंतर प्रामाणिकपणा सिद्ध करण्यासाठी काही वेळा प्रमाणपत्र नक्कीच गरजेचं असतं, असा टोला देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. शिवसेनेचं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी राज्यपालांच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असं उत्तर उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं. याच पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी वापरलेले शब्द नक्कीच ठाकरे सरकारवर निशाणा साधणारे आहेत. राज्य सरकार मंदिरं भाविकांसाठी का खुली करत नाहीत, असा सवाल राज्यपालांनी मुख्यमंत्रांना पत्रातून केला होता. त्यातबरोबर, मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरूनही डिवचले होते. मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना माझ्या हिंदुत्वाला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असा सडेतोड उत्तर दिलं होते . यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. आता यात अमृता फडणवीस यांनीही बंद मंदिरांविरोधात ठाकरे सरकारला घेरले आहे.
@@AUTHORINFO_V1@@