'इतरांना दोष देण्याआधी आपल्या घरातील प्रश्न मिटवा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Oct-2020
Total Views |

nitesh rane_1  


मुंबई :
राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात हिंदुत्वाच्या केलेल्या उल्लेखावरून वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मला कुणाकडून हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असे सांगत राज्यपालांना पत्राच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, आता भाजप आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्वावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.





मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला सातत्याने टीकेचे लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनी ट्विटरवरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्या एका जुन्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सवाल विचारला आहे. धर्मनिरपेक्षता संपलीय, आता भारताला हिंदूराष्ट्र घोषित करावे, असे विधान संजय राऊत यांनी केले होते. त्या विधानाचा आधार घेत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. माननीय मुख्यमंत्री यालाही प्रत्युत्तर देणार आहेत का? की हे नेहमीप्रमाणे निव्वळ राजकारण आहे. इतरांना दोष देण्याआधी स्वत:च्या घरातील प्रश्न सोडवा, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.
@@AUTHORINFO_V1@@