'देह वेचावा कारणी' विखेंच्या आत्मचरित्रासाठी समर्पक शीर्षक : पंतप्रधान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Oct-2020
Total Views |
PM Modi_1  H x
 
 


प्रवरानगर : बाळासाहेब विखे पाटील यांच्या 'देह वेचावा कारणी' या आत्मचरित्राचे प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले. कोरोना महामारीमुळे पंतप्रधान व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यात सहभागी झाले होते. 'बाळासाहेब विखे पाटील यांनी राज्यातील जनतेसाठी आपले जीवन वाहिले आहे. जनतेच्या समस्या सोडवण्याचे कार्य विखे यांनी आजन्म केले, राजकारण करत असताना त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी भर दिला' असे गौरवोद्गार काढत त्यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचे स्मरण केले. फडणवीस सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचे कौतुकही केले.
 
 
 
पंतप्रधान मोदी यांनी 'प्रवरानगर, छत्रपती शिवाजी महाराज तसेच वीर विरांगणा कर्मयोग्यांच्या भूमीला मी वंदन करतो', अशी भावनिक साद घालून उपस्थितांची मने जिंकली. ते म्हणाले, 'बाळासाहेब विखे पाटील यांचा प्रत्येक राजकीय पक्षांशी संबंध होता. त्यांच्या जीवनावर आधारित हे पुस्तक महत्वपूर्ण आहे. गाव, गरीब कुटूंबांना, शेतकऱ्यांना विखे यांनी जवळून पाहिले आहे. यासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले.
 
 
 
अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळातील मंत्रीमंडळात असताना विखे यांनी सहकार क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाची मोदींनी आठवण करून दिली. त्यांच्या आत्मचारित्राचे देह वेचावे हे नाव समर्पक आहे, असे ते म्हणाले. "ग्रामीण भागात शिक्षणाची ज्यावेळी चर्चाही नव्हती. त्यावेळेस विखे पाटील यांनी जनजागृतीचे काम केले आहे. शेतकरी काय पिक घेईल, कोणते बियाणे वापरेल, त्याला आर्थिक अडचणी कोणत्या येतील. त्यासाठी उपाय काय असणार याची माहितीही त्यांना होती.", असेही ते म्हणाले.
 
 
 
मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढीसाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांचा पाढाही पंतप्रधानांनी वाचून दाखवला. "पिक विमा यासाठी केंद्र सरकारने अडचणी दूर करण्यासाठी मदत केली आहे. PM किसान समान योजनेतून शेतकऱ्यांच्या अडचणीतून मुक्तात करण्यात आली आहे. योजनेतून १ लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यामध्ये कुणीही मध्यस्थी नाही. एवढंच नाहीतर मेगा फ्रुड पार्क, कोल्ड स्टोरेज, अनेक योजनांवर मोदी सरकारचे काम सुरू आहे", असेही मोदी म्हणाले.
 
फडणवीसांचे कौतूक
 
'पिण्यासाठी पाणी आणि शेतीसाठी पाण्याच्या वापराची मोठी समस्या आहे. पाणीटंचाईची मोठी समस्या महाराष्ट्रात आहे. फडणवीस यांच्या काळात जलयुक्त शिवार योजनेतून मोठे काम झाले आहे'असे म्हणत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. 'राज्यातील अनेक भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. या भागात अटल भूजल योजनेद्वारे काम सुरू आहे. जल जीवन मिशन योजनेतून महाराष्ट्रातील जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा लाखो लोकांना पाणी पुरवठा केला आहे' असेही ते म्हणाले.
 
 
कोरोनाचा धोका टळलेला नाही
 
जोपर्यंत औषध नाही तोपर्यंत सवलत नाही, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनबद्दल आणि निर्बंधांबद्दल माहिती दिली. 'कोरोना महामारीचा धोका अजून टळला नाही. महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. नियमित मास्क वापरा, नेहमी हात स्वच्छ करत राहा. ही लढाई आपण नक्की जिंकू आणि जिंकणारच, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला. 



@@AUTHORINFO_V1@@