हाथरस प्रकरणी उच्च अलाहाबाद न्यायालयात सुनावणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Oct-2020
Total Views |

Hathras_1  H x
नवी दिल्ली : हाथरस प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या सुनावणीला उपस्थित राहण्यास पिडीतेचे कुटुंब लखनौला रवाना झाले आहे. न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकार आणि युपी पोलिसांनाही समन्स पाठवला आहे. एसडीएम अंजली गंगवार यांनी सांगितले, की या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षकही आपल्यासोबत येणार असल्याची माहिती गंगवार यांनी दिली.
 
 
पीडितेच्या कुटुंबातील पाच सदस्यांना लखनौला घेऊन जाण्यात आले. १४ सप्टेंबरला हाथरसमधील एका तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर उपचारांदरम्यान २९ सप्टेंबरला तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून, अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.
@@AUTHORINFO_V1@@