मुकुंद चितळे ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या समितीचे सदस्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Oct-2020
Total Views |
Mukund Chitale_1 &nb
 
 
नवी दिल्ली : लोकमान्य सेवा संघाचे अध्यक्ष तथा मुकुंद एम. चितळे अ‍ॅण्ड कंपनीचे संस्थापक मुकुंद चितळे यांची ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भांडवली बाजार नियामक मंडळ (सेबी) अंतर्गत येणारी ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’ ही समिती नफा आणि ना नफा तत्त्वावरील कंपन्यांसाठी आवश्यक नियमावली, खुलासे या संदर्भातील नियमावली तयार करणारी यंत्रणा आहे. यात आणखी तीन नव्या सदस्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
 
चितळे यांच्यासह ‘ग्रासरुट्स रिसर्च अ‍ॅण्ड अ‍ॅडव्हॉकसी मूव्हमेंट’चे संस्थापक अध्यक्ष आर बालसुब्रह्मण्यम, इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे साहाय्यक प्राध्यापक प्रसन्न तंत्री यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या तंत्रज्ञ समितीची स्थापना सप्टेंबर महिन्यात झाली होती. त्यावेळी एकूण १७ सदस्यांची नेमणूक करण्यात आली होती.
 
 
समितीच्या अध्यक्षपदी ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष हर्ष भानवाला यांची नेमणूक करण्यात आली आहे. ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’च्या कार्यकारी समूहाच्या प्रस्तावानुसार तंत्रज्ञ समिती नेमण्यात आली आहे. ‘हावर्ड बिझनेस स्कूल’चे प्राध्यापक आणि ‘आशा इम्पॅक्ट’चे संस्थापक विक्रम गांधी, अशोका युनिव्हर्सिटीअंतर्गत चालवल्या जाणार्‍या सामाजिक केंद्राचे संस्थापक गाईडस्टारचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पा अमन सिंह आणि केपीएमजीचे सीएसआर अ‍ॅडव्हायझरी हेड संतोष जयराम आदी सदस्य या समितीवर आहेत.
 
 
नुकतीच या संदर्भातील ‘सोशल स्टॉक एक्सचेंज’वरील कार्यकारणी समूहाचे अध्यक्ष इशात हुसैन यांनी १ जून रोजी पाठवलेल्या अहवालानुसार, बिगर नफा संस्था आणि नफा संस्थांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची शिफारस केली होती. बिगर नफा संस्थांच्या आर्थिकदृष्ट्या प्रमाण निर्देशित करणारी नियमावली असावी, असेही त्यात म्हटले होते.
 
 
याशिवाय, बॉण्ड जारी करण्याद्वारे ना-नफा संस्थांची थेट यादी करणे आणि पर्यायी गुंतवणूक फंडांतर्गत ‘सोशल व्हेंचर फंड’ यासारख्या यंत्रणेचा समावेश असलेल्या अनेक प्रकारच्या वित्तपुरवठा यंत्रणेची शिफारस कार्यकारी समूहाने केली आहे. सामाजिक संस्था किंवा ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर सुरू असलेल्या संस्थांना भांडवली बाजारातून वित्तपुरवठा मिळवता येतो. त्या संदर्भात नेमकी नियमावली काय असावीत, तसेच मार्गदर्शक तत्त्वे काय असावीत यांचे नियामक मंडळ म्हणून सोशल स्टॉक एक्सचेंज आणि इतर समित्या सेबीअंतर्गत याची पाहणी करतात.
 
 
मुकुंद चितळे यांचा अल्पपरिचय
 
स्वतः व्यवसायाने एक चार्टड अकाऊंटंट असलेले मुकुंद चितळे ‘मुकुंद एम. चितळे अ‍ॅण्ड कंपनी’ या फर्मचे संस्थापक आहेत. आपल्या ३५-४० वर्षांच्या अनुभवासह वित्तीय सेवा क्षेत्रातील उल्लेखनीय नाव म्हणून चितळे यांची ओळख आहे. तसेच ९७ वर्षांची परंपरा असलेल्या विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघ या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत.


@@AUTHORINFO_V1@@