कुलगाममध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

Kulgam_1  H x W
 
 
श्रीनगर : कुलगाम जिल्ह्यातील चिंगाम प्रांतात झालेल्या चकमकी दरम्यान सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या ठिकाणी हल्लेखोर लपल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार संपूर्ण परिसरात शोधमोहिम हाती घेण्यात आली. यावेळी उडालेल्या चकमकीत दोन दहशकवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. चिंगाम प्रांतात अद्याप शोधमोहिम सुरू असून काही परिसर सुरक्षा यंत्रणांनी सील केला आहे. तसेच अद्याप चकमक सुरू आहे.
 
 
 
रात्री उशिरा झालेल्या चकमकीनंतर राज्य पोलिस, राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले होते. याबाबत काश्मीर विभागीय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुलगाममधील चिंगाम भागात चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जवानांनी सर्च ऑपरेशन सुरु केले. या दरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. या गोळीबाराला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ज्या ठिकाणी चकमक झाली तो परिसर रिकामा करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरुच आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@