महिला सुरक्षेसाठी केंद्राची कठोर पाऊले

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

sop_1  H x W: 0
 
नवी दिल्ली : देशात होणाऱ्या बलात्कार प्रकरणामध्ये आता महिला सुरक्षासाठी गृह मंत्रालयाने कठोर पाऊले उचलली आहेत. शनिवारी गृह मंत्रालयाने महिला सुरक्षेसंबंधीत तीन पानांचे परिपत्रक राज्य सरकारांना जारी केले आहे. बलात्कारप्रकरणी तक्रार दाखल करणे अनिवार्य असून आयपीसी आणि सीआरपीसी नियामांचे पालन राज्य सरकारने करावे. तसेच गैरजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यायला हवी, असे गृह मंत्रालायने या पत्रात सांगितले आहे.
 
 
बलात्कार प्रकरणी तक्रार दाखल करणे अनिवार्य आहे. तसेच झिरो एफआयआर दाखल करण्याचे ही तरतूद आहे. आयपीसी कलम १६६ अ (क) अंतर्गत तक्रार दाखल करण्यास नकार देणाऱ्या अधिकाऱ्यांला शिक्षा देण्याची तरतूद आहे. तसेच, सीआरपीसी कलम १७३ अंतर्गत बलात्कार प्रकरणातील चौकशी दोन महिन्यांच्या आत करण्याची तरतूद आहे. तसेच, अशा सर्व प्रकरणाचे मॉनिटरींग करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक ऑनलाईन पोर्टल तयार केले आहे.
 
 
सीआरपीसीच्या कलम १६४ - अ नुसार, नोंदणीकृत वैद्यकीय अधिकारी बलात्कार किंवा लैंगिक अत्याचाराच्या घटनेमध्ये २४ तासांच्या आत पीडितेच्या संमतीने वैद्यकीय तपासणी करेल. भारतीय पुरावा कायद्याच्या कलम ३२ (१) नुसार तपासात मृत व्यक्तीचे जबाब महत्त्वपूर्ण असेल. फोरेंसिंक सायन्स सर्व्हिसेस डायरेक्टरेटने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात फॉरेन्सिक पुरावे गोळा आणि संग्रहित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यांचे अनुसरण करावे. पोलिसांनी या तरतुदींचे पालन न केल्यास पीडितेला न्याय मिळणार नाही. या प्रकरणात निष्काळजीपणा समोर आल्यास संबधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहिजे.
 
 
झिरो एफआयआरनुसार ज्या ठिकाणी बलात्कार झाला आहे. त्या ठिकाणापासून जवळ असलेल्या कोणत्याही ठिकाणी एफआयआर दाखल करता येते. त्यानंतर ज्या पोलीस स्थानकाच्या हद्दीत घटना घडली असेल. त्या स्थानकात एफआयआर पाठवला जातो. यामुळे घटनेवर त्वरीत कारवाई होणे शक्य होते. दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी निर्भया हत्याकांड घडल्यानंतर 'झिरो एफआयआर'ची संकल्पना मांडण्यात आली होती. त्यानंतर न्यायमूर्ती वर्मा यांच्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार गुन्हेगारी कायद्यात सुधारणा करत 'झिरो एफआयआर' नियम लागू करण्यात आला होता.
 
 
@@AUTHORINFO_V1@@