“आधी शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतारा”

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Oct-2020
Total Views |

Gopichand Padalkar_1 
 
 
मुंबई : ‘आजोबांच्या खांद्यावर बसून मी सर्वात उंच असा आभास असलेया रोही पवारांनी खाली उतरावे, मग कळेल.” अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांच्यावर केली आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघातील मिरजगाव येथून जात असताना तेथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून पडळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. ट्विटरवर एक व्हिडियो पोस्ट करत त्यांनी कर्जत- जामखेडमधील मिरजगावच्या ग्रामस्थांची चर्चा केली.
 
 
 
 
 
“गेल्या ५० वर्षांपासून देशाचे आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत. पण या मतदारसंघातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे रोहित दादांनी इतरांना मोठमोठे सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते पाहावेत. आजोबांच्या खांद्यावर बसून इतरांना सल्ले देऊ नये,” अशी बोचरी टीका पडळकरांनी केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@