ठाकरे सरकारच्या व्यवस्थेचे बळी !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

student_1  H x


बीड  :
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याने व राज्य सरकारने याविषयी कोणतीही ठोस भूमिका स्पष्ट करत नसल्याने मराठा तरुणांमधील मानसिक ताण वाढतो आहे.तर दुसरीकडे, ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय राज्य सरकारने उपलब्ध करून दिला मात्र, यासाठीची पुरेशी साधन उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक नुकसान होण्याची भीती वाढते आहे. याच नैराश्यातून दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राज्यात घडली आहे.



बीड तालुक्यातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. ३०) दुपारी दीड वाजता तालुक्यातील केतुरा येथे घडली. दरम्यान, आरक्षणाला स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाइकांनी केला आहे. केतुरा येथील शेतकरी कुटुंबातील विवेक कल्याण रहाडे (वय १८) हा बारावीमध्ये चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झाला होता. त्याचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. वैद्यकीय प्रवेशासाठी त्याने १५ दिवसांपूर्वी नीट परीक्षा दिली होती.या परीक्षेसाठी त्याने चांगली तयारी केली होती; मात्र आता आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे शुल्क भरून शिक्षण घेणे अवघड आल्याच्या तणावातून त्याने बुधवारी दुपारी स्वत:च्या शेतात जाऊन झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, पोलिस नाईक राम भंडाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.



विवेकचे मामा नवनाथ गणपती वांढरे (रा. केतुरा) यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. विवेक रहाडे याच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर त्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिट्ठी घरात आढळून आली. त्यात त्याने मराठा समाजाच्या आरक्षणाचा स्थगिती मिळाल्याने वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे म्हटले आहे. खासगी संस्थेत शिक्षण घेण्याची ऐपत नाही. केंद्र व राज्य सरकारने आता तरी समाजातील मुलांची कीव करावी, असा उल्लेख केलेला आहे. कुटुंबीयांनी ही चिठ्ठी पोलिसांकडे दिली असून, आरक्षण स्थगितीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे.


खासगी शिक्षण घेण्याची ऐपत नाही...

मी एक कष्टकरी आणि गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला जीवनात खूप मोठे होण्याची इच्छा आहे. मराठा आरक्षण गेल्यामुळे माझा वैद्यकीयला नंबर लागणार नाही. खासगी महाविद्यालयांत वैद्यकीय शिक्षण घेण्याची माझी ऐपत नाही. त्यामुळे मी माझे आयुष्य संपवत आहे, अशी चिठ्ठी विवेकने लिहिली आहे.
तर दुसरीकडे, काल कराड तालुक्यातील ओंड या गावातील साक्षी आबासाहेब पोळ (वय १५) या दहावीत शिकत असणाऱ्या तरुणीने ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेता येत नसल्यामुळे नैराश्य आलेल्या दहावीतील विद्यार्थिनीने अखेर गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. आई स्वाती यांनी दिलेल्या जबाबानुसार, श्रीमती स्वाती या ओंडमध्ये मजुरी करतात. साक्षी ही ओंड येथील हायस्कूलमध्ये दहावीत शिकत होती. शाळेचे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. तो अभ्यास चुकत असल्याने साक्षीने आईकडे मोबाईलसाठी मागणी केली होती. वारंवार मागणी करूनही आईला मोबाईल घेऊन देता आला नाही. अभ्यास चुकतोय या तणावात साक्षी होती. अखेर तिने आई कामावर गेल्यानंतर घरात कोणीही नाही पाहून घरात गळफास लावून घेतला. पोलिस निरीक्षक धुमाळ म्हणाले, साक्षीचा अभ्यास चुकत होता. शाळा ऑनलाइन शिक्षण देत आहे. त्यासाठी मोबाईल पाहिजे होता. मात्र, तो तिला न मिळाल्याने व अभ्यास चुकतोय या तणावाखाली साक्षीने आत्महत्या केल्याचा जबाब तिची आई स्वाती यांनी दिला आहे.'' तपास पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बाळासाहेब जगदाळे करत आहेत.
@@AUTHORINFO_V1@@