'आतातरी किंमत देणार की, पुन्हा कवडीची किंमत ?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

parth pavar sharad pawar_


मुंबई :
राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा आरक्षणाबाबत पार्थ पवार यांच्या ट्वीटवर भाजप नेते राम कदम यांनी ठाकरे सरकार तसेच शरद पवार यांना टोला लगावला आहे. आतातरी पार्थ यांना किंमत देणार की, पुन्हा कवडीची किंमत? असा सवाल राम कदम यांनी विचारला आहे. ट्विट करत राम कदम यांनी निशाणा साधला आहे.


ते म्हणतात,"महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षणबाबत आक्रमकपणे पुढे यावे या पार्थ पवार यांच्या मागणीला महाविकास आघाडी किंमत देणार की, कवडीची किंमत देणार ?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, सुशांत सिंह प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीवरून समाचार घेतला होता. पार्थ यांच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही, त्यांची राजकीय कारकीर्द अपरिपक्व आहे, असे विधान पवारांनी केले होते.पार्थ यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.


मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे भाजप नेत्यांनी स्वागत केले असून यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरदेखील निशाणा साधला आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात,"मराठा आरक्षण प्रकरणी एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत संयत आणि योग्य आहे. पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय" असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.
@@AUTHORINFO_V1@@