पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार ; ३ जवान शहीद, ५ जखमी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

indo pak_1  H x


जम्मू :
पाकिस्तानने सकाळी कृष्णा घाटीमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने त्या गोळीबारात लान्स नायक शहीद झालेले असताना पुन्हा कुपवारातील नौगाम सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले आहेत. तर चार जवान जखमी झाले आहेत.पाकिस्तानच्या या गोळीबाराला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं जात आहे.

सीमेपलीकडून झालेल्या या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून चार जण जखमी झाले आहेत असे कर्नल कालिया यांनी सांगितले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अचानक तोफगोळे डागले गेले. यात दोन शहीद झाले तर, चार जवान जखमी झाले, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. या हल्ल्यात जखमी जवानांना तेथून तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय जवानांनी देखील पाकिस्तानी सैनिकांना सडेतोड उत्तर देणे सुरू केले. भारतीय जवानांनी सुरू केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे किती नुकसान झाले, किंवा किती पाकने किती सैनिक गमावले याबाबत माहिती मिळू शकलेली नाही.गेल्या आठ महिन्यांच्या काळात पाकिस्तानने ३००० हून अधिकवेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. गेल्या १७ वर्षांमधील हे सर्वाधिक उल्लंघन आहे. सन २००३ मध्ये भारत आणि पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचा करार केला होता.
@@AUTHORINFO_V1@@