'पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Oct-2020
Total Views |

MLA atulbhatkhalkar_1&nbs


मुंबई :
मराठा आरक्षणासाठी बीड येथील विवेक रहाडे या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे भाजप नेत्यांनी स्वागत केले असून यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरदेखील निशाणा साधला आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात,"मराठा आरक्षण प्रकरणी एका तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत संयत आणि योग्य आहे. पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय" असं म्हणत त्यांनी शरद पवारांना टोला लगावला.



दरम्यान,पार्थ पवार यांनी विवेक रहाडेचा फोटो ट्विटरवर पोस्ट करून हे ट्विट केले आहे. ”विवेकनं आमच्या मनात पेटवलेली संघर्षाची ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. संपूर्ण मराठा तरुणांचं भवितव्य अंधकारमय झालं आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. त्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरला नाही,’ असं पार्थ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.लाखो असहाय विवेकला न्याय मिळावा म्हणून माझ्या मनातील मराठा आरक्षणाची पेटलेली मशाल पुढे नेण्यास मी तयार आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणासाठी विवेकने आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा घटना घडण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घातलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.


@@AUTHORINFO_V1@@