गँगस्टर लकडावालाला मुंबई पोलिसांच्या बेड्या

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : मुंबई पोलिसांकडून गुरुवारी मोठी कारवाई करण्यात आली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा अगदी जवळचा सहकारी मानला जाणारा गँगस्टर एजाज लकडावाला याला अखेर अटक करण्यात आली आहे. बिहारमधील पटनामध्ये त्याला बेड्या ठोकण्यात आल्या असून २१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात येणार आहे. एजाज लकडावालावर जवळपास २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

 
मुंबईत झालेल्या अनेक गुन्ह्यांमध्ये लकडावालाचा सहभाग होता. वर्ष २००३ मध्ये एजाज लकडावालाचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली होती. मात्र तो बँकॉकवरुन कॅनडाला पळून गेला होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो तिथेच होता. लकडावालाने छोटा राजनशी हातमिळवणी केल्याने दाऊद नाराज असल्याची चर्चा होती. एजाज लकडावालाच्या मुलीला काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावर अटक केली होती. ती बोगस पासपोर्टवर देश सोडून जात होती. तिला अटक केल्यानंतर तिच्याकडे केलेल्या तपासात एजाज लकडावालाची माहिती उघड झाली होती.
@@AUTHORINFO_V1@@