इराणचा थेट अमेरिकी दूतावासाजवळ हल्ला ; संघर्ष आणखी तीव्र

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकी दूतावासाजवळ इराणकडून २ क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात आला. इराणने इराकमधल्या अमेरिकेच्या २ लष्करी तळांवर आतापर्यंत २२ क्षेपणास्त्रांचा हल्ला केल्याने इराण आणि अमेरिकेतील संघर्ष तीव्र झाला. त्यानंतर पुन्हा एकदा इराकची राजधानी बगदादमधल्या अतिसुरक्षित ग्रीन झोनमध्ये २ क्षेपणास्त्र डागली. या हल्ल्यात कुठलीही हानी झाली नसल्याचा दावा इराकने केला आहे.

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा..

इराण अमेरिका तणावाचा भारतावर 'हे' परिणाम... 
 
 

अमेरिकेच्या दूतावासापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर हा हल्ला करण्यात आला. मात्र, अद्याप कोणीही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. इराकच्या अल असद बेसची छायाचित्रं जारी करण्यात आली आहेत. हल्ल्याआधी आणि नंतरच्या छायाचित्रांमध्ये मोठा फरक दिसत आहे. नुकसान झाल्याचे छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. या दोन देशांमधील संघर्षामध्ये जगामध्ये आर्थिक व्यवस्था मात्र ढासळत चाललेली आहे.

@@AUTHORINFO_V1@@