सर्वांनी आदर्श घ्यावा अशी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची कामगिरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


पणजी : सवर्च मुख्यमंत्र्यांनी आदर्श घ्यावा अशी कामगिरी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केली आहे. पेशाने डॉक्टर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आपला ताफा थांबवून अपघातग्रस्त तरूणाची मदत केली आहे. गुरूवारी दुपारी पोंडा शहरापासून ३५ किमी असलेल्या खांडेपार येथे ही घटना घडली.

 

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी हेही वाचा...

गोमंतकाचा नवा आवाज... 
 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे संजीवनी सहकारी साखर कारखान्यासंदर्भातील समस्या जाणून घेण्यासाठी जात होते. त्यावेळी खांडेपार पूलावर एक दुचाकी चालक अपघातग्रस्त होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला त्यांना बघितला. त्यावेळी लगेच त्यांच्या चालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी त्या तरूणाची आस्थेने चौकशी केली. तसेच अपघातग्रस्त तरुणाला उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे काही क्षणातच रूग्णवाहिका घटनास्थळावर पोहचली. जखमी तरूणाला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले. यापूर्वीदेखील यांनी दोन वेळा रस्त्यात अपघातग्रस्त चालकांना ताफा थांबवून मदत केली आहे.

@@AUTHORINFO_V1@@