दिल्लीत भीषण आग ; एकाचा मृत्यू

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0


नवी दिल्ली : शहरातील पतपरगंज औद्योगिक परिसरात एका प्रिंटिंग प्रेसला आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून ३५ अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग नियंत्रणात आली असून शोधकार्य सुरू असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

 

रात्री २.४० च्या दरम्यान आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाला मिळाली. त्यानंतर तत्काळ घटनास्थळी १२ गाड्या पाठवण्यात आल्या. मात्र, त्यानंतर अधिक गाड्या आग विझवण्यासाठी पाठवण्यात आल्या. १५० कर्मचारी आग विझवत आहेत, अशी माहिती अग्मिशामक दलाचे अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली. ही प्रिंटिंग प्रेस दुमजली इमारतीत असून तळमजल्यापासून दुसऱ्या मजल्यापर्यंत आग पसरली होती. स्कायलिफ्टद्वारे वरील मजल्याला लागलेली आग विझवण्यात आली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शोधकार्य सुरू आहे.

@@AUTHORINFO_V1@@