खुशखबर ! घोडेस्वारीमध्ये भारताचा ऑलिम्पिकमध्ये प्रवेश...

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : भारताचा युवा घोडस्वार फवाद मिर्झाने भारताची बऱ्याच वर्षांची प्रतिक्षा अखेरीस संपवली. त्याने घोडेस्वारीमध्ये टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले आहे. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर इक्वेस्ट्रियन स्पोर्ट्स (एफइआई) कडून मंगळवारी याच्यावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यांनी टोकियो ऑलिम्पकसाठी पात्र खेळाडूंची यादी प्रसिध्द केली आहे. त्यामुळे तब्बल २० वर्षानंतर भारताला घोडेस्वारीमध्ये ऑलिम्पिक कोटा मिळाला आहे.

 

युवा फवाद मिर्झाने याबाबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले की, "माझी टोकियो ऑलिम्पिकसाठी निवड झाली आहे. मात्र, अद्याप खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. निवड ही लक्ष्य गाठण्याची पहिली पायरी असून या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी मी कठोर मेहनत घेत आहे." 

 

घोडेस्वारीमध्ये यापूर्वी १९९६ मध्ये विंग कमांडर एलजे लांबा यांनी अटलांटा ऑलिम्पकमध्ये तर २००० साली इम्तियाज अनिस याने सिडनी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. २७ वर्षीय फवादने गेल्या काही स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी केली होती. त्याने २०१८ मध्ये जकार्ता एशियन गेम्स स्पर्धेत खेळताना, भारताला तब्बल ३६ वर्षानंतर पदक जिंकून दिले. तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये पात्र ठरणारा भारताचा पहिला घोडेस्वार आहे.