दिपीकाचा जेएनयूतील प्रवेश म्हणजे 'काँग्रेसी कनेक्शन' आहे का ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


saf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले. जागोजागी आंदोलने झाली, वादविवादही झाले. परंतु, या सर्वात सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले ते म्हणजे दीपिका पडुकोनने. दीपिकाने जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी गेली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. ती नक्की तिच्या आगामी चित्रपटाच्या 'प्रमोशन'साठी गेली होती की कथित समाजभान दाखवण्यासाठी, याबाबत बरेच वादविवादही झाले. यापूर्वीदेखील दीपिकाने काही वर्षांपूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा व्यक्त केली होती.

 

२०१०मध्ये जेव्हा दूरदर्शनच्या एका मुलाखतीमध्ये तिने राहुल गांधींचे गुणगान गायले होते. तिला यावेळी 'तुम्ही कोणत्या नेत्याशी जास्त प्रभावित होता?' असा प्रश्न विचारला होता. त्यावर तिने सांगितले होते की, "मला राजकारणाबद्दल फार काही माहित नाही. पण जे काही मी टीव्हीवर पाहते त्यावरुन मला वाटते राहुल गांधी आपल्या देशासाठी जे काही करत आहेत ते आपल्या देशासाठी एक चांगले उदाहरण आहे. ते आपल्या देशासाठी खूप काही करत आहेत. मला वाटतं ते एक दिवस देशाचे पंतप्रधान होतील."

 
 
 

तिला त्यानंतर विचारण्यात आले होते की, तुम्हाला राहुल गांधींनी पंतप्रधान झालेलं आवडेल का? यावर तिने उत्तर दिले होते की, "हो, मला वाटते की राहुल गांधी पंतप्रधान व्हावे. कारण त्यांच्यातली खास गोष्ट अशी आहे की ते तरुणाईसोबत चांगल्या प्रकारे जोडले जातात. त्यांचे विचार पारंपरिक तर आहेतच पण त्यासोबतच भविष्याच्या दृष्टीकोणातूनही महत्त्वपूर्ण आहे. जे आपल्या देशासाठी महत्त्वाचे आहेत." तिच्या या मुलाखतीचा व्हिडियो सध्या खूप ट्रोल होत आहे. जेएनयूमध्ये तिने दाखवल्या उपस्थितीवर तिने 'प्रमोशन'साठी केले की 'इमोशन'साठी हाच प्रश्न देशभर विचारला जात आहे.

@@AUTHORINFO_V1@@