'छपाक'च्या विरोधात पुन्हा याचिका ; लक्ष्मीची वकील कोर्टात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


chapak_1  H x W


नवी दिल्ली : दीपिका पदुकोणचा चित्रपट छपाक येत्या शुक्रवारी म्हणजेच १०जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट अडचणीत आला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यासाठी वकील अपर्णा भट्ट यांनी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल केली आहे. अर्पणाने लक्ष्मी अग्रवालला न्याय देण्यासाठी हा खटला बरीच वर्षे लढला. अपर्णाने याचिकेत म्हटले आहे की,लक्ष्मी अग्रवालसाठी तिने अनेक वर्षे हा खटला लढला परंतु त्यांना या चित्रपटात त्यांना कोणतेही श्रेय दिले गेले नाही. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून त्वरित थांबविण्यात यावा. यापूर्वी एका लेखकाने चित्रपटासंदर्भात एक कॉपी राइट केस दाखल केला होता.






ही याचिका राकेश भारती नावाच्या लेखकाने दाखल केली आहे. त्यामध्ये राकेशने असा दावा केला आहे की त्याने अ‍ॅसिड हल्ल्यामुळे पीडितेच्या जीवनावर एक कथा लिहिलेली आहे. राकेशने या चित्रपटाचे श्रेय मागितले. या प्रकरणात निकाल देताना, मुंबई हायकोर्टाने बुधवारी सांगितले की, खऱ्या घटनांनी प्रेरित कथेवर कोणताही माणूस कॉपीराइटचा दावा करू शकत नाही.

@@AUTHORINFO_V1@@