मध्य रेल्वेच्या वाहतुकीला पुन्हा 'तडा'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : मुंबईची लाईफ लाईन असलेली मुंबई लोकल पुन्हा एकदा खोळंबली आहे. ऐन गर्दीच्या वेळेस लोकल खोळंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कसारा-कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच, नाशिकमार्गे येणाऱ्या सर्व एक्सप्रेस थांबवण्यात आल्या आहेत. वासिंद, खडवली, आसनगाव दरम्यान अनेक लोकल रखडल्या आहेत.

 

मध्य रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर सकाळी ९.३५ वाजण्याच्या सुमारास रेल्वे रुळ दुरुस्त करण्यात आला. मात्र, या मार्गावरून जाणाऱ्या लोकलवर ताशी ३० किमी इतक्या वेगाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्यामुळे लोकल उशिराने धावत आहेत. ऐन सकाळीच मध्य रेल्वेचा खोळंबा झाल्यामुळे सकाळी ऑफिस, कॉलेज गाठणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. याआधी बुधवारीदेखील काही तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वे खोळंबली होती.

@@AUTHORINFO_V1@@