अमेरिकेसह १६ देशांचे राजदूत श्रीनगर दौऱ्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2020
Total Views |


america_1  H x



नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७०मागे घेतल्यानंतर, भारतातील अमेरिकेचे राजदूत केनेथ आय जस्टर यांच्यासह १६ देशांचे राजदूत गुरुवारी सद्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी श्रीनगर येथे दाखल झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की दिल्लीत राहणारे मुत्सद्दी श्रीनगरमधील विमानतळावर विशेष विमानाने काश्मीरमध्ये दाखल झाले. तेथील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. या दौर्‍यादरम्यान लेफ्टनंट गव्हर्नर जीसी मुर्मू आणि सिव्हिल सोसायटीच्या सदस्यांची भेट घेतील. या प्रतिनिधी मंडळामध्ये अमेरिकाव्यतिरिक्त बांगलादेश, व्हिएतनाम, नॉर्वे, मालदीव, दक्षिण कोरिया, मोरोक्को, नायजेरिया आणि इतर देशांतील राजदूतही सामील आहेत. ब्राझीलचे राजदूतही या दौर्‍यावर येणार होते. पण दिल्लीत व्यस्त असल्यामुळे त्यांनी येणे रद्द केले.



युरोपियन युनियन राजदूतही देणार भेट

युरोपियन युनियन देशांतील राजनयिकांनी सरकारला सांगितले की, तेही ठरविक तारखेला या केंद्रशासित प्रदेशाला भेट देतील. त्याचबरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांच्या भेटीचा आग्रह धरला आहे, ज्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे.



परदेशी राजनयिकांनी भेटीची केली आहे मागणी

अधिकाऱ्यांच्या मते, गुरुवारी काश्मीरच्या दौर्‍यावर येणारे राजदूत सिविल सोसायटी सदस्यांची भेट घेतील. विविध एजन्सीमार्फत त्यांना राज्यातील सुरक्षा परिस्थितीची जाणीवही करून दिली जाईल. अधिकाऱ्यांनी सांगितले की कित्येक देशांतील राजदूतांनी काश्मीरला भेट देण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली होती. पाकिस्तानच्या काश्मिरवरील अपप्रचाराच्या वास्तविकतेबद्दल परराष्ट्रातील राजदूतांना काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत जागरूक करण्याच्या प्रयत्नांत भारत सरकार आहे त्यासाठीच हा दौरा आहे.



२३ युरोपियन खासदारांनी प्रवास केला

तत्पूर्वी, युरोपियन युनियनच्या २३ खासदारांनी काश्मीरला भेट देऊन तिथल्या परिस्थितीची माहिती घेतली. तथापि, एका स्वयंसेवी संस्थेने ही भेट आयोजित केली होती.

@@AUTHORINFO_V1@@