पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे उपभोगशून्य स्वामी! : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


नवी दिल्ली : "संवेदनशील व्यक्ती, कुशल प्रशासक, निडर सेनापती, विचारधारेशी एकनिष्ठ कार्यकर्त्यांची बांधणी करणारा आणि संघटनशक्तीच्या आधारे सकारात्मक राजकारण करणारा नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. समर्थ रामदासांच्या शब्दांत वर्णन करावयाचे तर उपभोगशून्य स्वामी असेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन करावे लागेल," असे प्रतिपादन देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी केले. 'हिंदी विवेक'च्या दशकपूर्तीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजवरचा प्रवास रेखाटणाऱ्या 'कर्मयोद्धा' ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे, विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, युपीएलचे अध्यक्ष रज्जूभाई श्रॉफ, कारुळकर प्रतिष्ठानच्या शीतल कारुळकर, हिंदी विवेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर उपस्थित होते.

 

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचे एका शब्दात वर्णन करावयाचे तर समर्थ रामदासांच्या 'उपभोगशून्य स्वामी' या शब्दात करावे लागेल. समाजाच्या वंचित वर्गातून आलेली एक व्यक्ती आज देशाच्या पंतप्रधानपदी पोहोचली आहे, त्यामागे त्यांचा त्याग आणि कर्तव्यनिष्ठा कारणीभूत आहे. नरेंद्र मोदी यांच्या राजकीय जीवनाविषयी बोलण्यापूर्वी राजकारणापूर्वीचे जीवन समजून घेणे गरजेचे आहे, त्याशिवाय नरेंद्र मोदी हे रसायन समजून घेता येणार नाही. 'राजा प्रथमो सेवकः' या चाणक्याच्या तत्त्वाचे तंतोतंत आचरण करणारा नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी," असे अमित शाह म्हणाले.

 

पुढे ते म्हणाले, की "विचारधारेशी एकनिष्ठ कार्यकर्ते, संघटन तयार करणे आणि संघटनेच्या आधारे सकारात्मक राजकारण करून राजकीय यश प्राप्त करणे, हे नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य आहे. नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा गुजरात भूकंपातून सावरत होता, त्यानंतर दंगलीचाही सामना करावा लागला. मात्र, त्यातून नरेंद्र मोदी यांनी मार्ग काढला आणि गुजरातमध्ये विकासाच्या राजकारणाची सुरुवात केली. तेच विकासाचे राजकारण त्यांनी पंतप्रधान झाल्यानंतरही सुरू ठेवले. म्हणूनच आज देशात परिवर्तन घडले असून गरीब, वंचित, शोषित हे सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत," असेही शाह यांनी नमूद केले.

 

'विवेक'सोबत माझा जुना ऋणानुबंध

 

"विवेक समूह आणि रमेश पतंगे यांच्यासोबत माझा जुना ऋणानुबंध आहे," असे अमित शाह यांनी विशेषत्वाने नमूद केले. "गुजरातमध्ये भाजपचे प्रथनच पूर्ण बहुमताचे सरकार आल्यानंतर गुजरात सरकारवर एका विशेषांक काढण्यासाठी रमेश पतंगे गुजरातमध्ये आले होते. त्यावेळी मी साधा वॉर्ड कार्यकर्ता होतो. तेव्हा गुजरात सरकारच्या मंत्र्यांशी पतंगे यांचा परिचय करून देण्यासाठी मी जात असे," अशी हद्य आठवण शाह यांनी यावेळी सांगितली. त्याचप्रमाणे देशात राष्ट्रवादी पत्रकारिता जपण्याचे काम विवेक करीत असल्याचेही शाह यांनी नमूद केले.

 
 

'...म्हणून हा ग्रंथ' : 'हिंदी विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर

 

संघपरिवारातील एखादा व्यक्ती ज्यावेळी उत्तुंग यश मिळविते, त्यामागील त्याचे कष्ट समाजासमोर आणणे गरजेचे असते. त्यासाठीच हा ग्रंथ असल्याचे रमेश पतंगे यांनी सांगितले. देशात सध्या अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे, त्या वातावरणास एखादा कर्मयोद्धाच उत्तर देऊ शकतो आणि ते काम पंतप्रधान मोदी उत्तम करीत असल्याचे दिलीप करंबेळकर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'गुजरात ते दिल्ली' हा संघर्षमय प्रवास ग्रंथात मांडता आल्याचा आनंद असल्याचे 'हिंदी विवेक'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल पेडणेकर यांनी सांगितले.

 
@@AUTHORINFO_V1@@