नीना कुलकर्णी दिसणार ‘महाराणी ताराबाईं’च्या भूमिकेत!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |

neena_1  H x W:



 कलर्स मराठी वाहिनीवरील ‘स्वामिनी’ या मालिकेची कथा
, उत्तम कलाकार, सादरीकरण यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये मालिकेबद्दल पुढे काय होणार याची उत्सुकता आहे. मालिकेमध्ये अनेक दिग्गज आणि मातब्बर कलाकार मुख्य भूमिकेत आहेत, गोपिकाबाईंची भूमिका ऐश्वर्या नारकर, काशीबाईंची भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी साकारत आहेत. आता लवकरच मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुनबाई आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या महाराणी ताराबाई यांचे आगमन होणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी महाराणी ताराबाई यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.

ताराबाईंच्या येण्याने कथेमध्ये कोणत्या महत्वपूर्ण घटना बघायला मिळतील याची उत्सुकता नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आहे. सध्या मालिकेत माधवरावांच्या दुसर्‍या विवाहाची बोलणी करण्यासाठी गोपिकाबाईंनी रमाबाईंना गर्‍हाड्याला राहण्याचा आदेश दिला आहे. ताराबाईंच्या येण्याने रमा
माधवच्या नात्यात कोणते बदल होतील ? मालिकेमध्ये पुढे काय होईल ? हे जाणून घेण्यासाठी पाहा ‘स्वामिनी’ रात्री ८.३० वा. कलर्स मराठीवर!

@@AUTHORINFO_V1@@