सूड बुद्धीने पेटलेल्या इराणचा अमेरिकी तळावर हल्ला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमधील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. इराणने बुधवारी आक्रमक पवित्रा घेत इराकमधील अमेरिकेच्या लष्करी हवाई तळांवर क्षेपणास्त्र हल्ला केला. इराणमधील महत्त्वाचे लष्करी अधिकारी कासीम सुलेमानीला अमेरिकेने रॉकेट हल्ल्यात ठार केल्यानंतर त्यांनी सूडबुद्धीनेच हा हल्ला केल्या असल्याचे मत वर्तविण्यात येत आहे. या हल्ल्यात ३० अमेरिकेचे सैनिक मारले गेल्याचे इराणच्या माध्यमांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर अमेरिकेने आखाती देशात जाणारी वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे.

 

इराणची निम-अधिकृत वृत्तसंस्था फार्स न्यूज एजन्सीने आपल्या ट्विटर हँडलवरून क्षेपणास्त्र सोडतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. याला त्यांनी "इराणच्या सूडाची सुरुवात; अमेरिकेच्या अल-अस्साद येथील लष्करी तळावर इराणी क्षेपणास्त्रे हल्ला करतानाचा क्षण" अशा आशयाचा मथळा दिला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणच्या हल्ल्याची माहिती देण्यात आली, असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.अमेरिकी संरक्षण मंत्रालयाचे सहायक जॉनथन हॉफमन यांनी या घटनेची पुष्टी केली आहे. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास इराणने दहा ते बारा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या इराकमधील लष्करी तळावर डागल्या, अशी माहिती त्यांनी दिली.

@@AUTHORINFO_V1@@