इराण अमेरिका तणावाचा भारतावर 'हे' परिणाम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    08-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाचे जगभरात पडसाद उमट आहेत. इराण आणि इराक हे तेल उत्पादन क्षेत्रातील महत्वाचे देश असल्यामुळे येथील वादामुळे भारतातील इंधनाचे दर वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. इराणने इराकमधील अमेरिकेच्या तळांवर हल्ला केल्यानंतर हा वाद आणखी चिघळत असल्याचे चित्र बुधवारी स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, अतिमहत्त्वाचे काम नसेल तर इराकमध्ये प्रवास करणे टाळावे. इराकमध्ये राहणाऱ्या भारतीयांनीही देशांतर्गत प्रवास टाळावा, असे आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने केले आहे.

 

भारतात पेट्रोल-डिझेलवर होणार परिणाम?

 

या तणावानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी आली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत ४.५ टक्क्यांची वाढ झाली. 'डब्लूटीआय'च्या इंडेक्सवर कच्च्या तेलाच्या किंमतीत ४.५३ टक्क्यांची वाढ होऊन ते ६५.५७ डॉलर्स प्रति बॅरल इतके झाले आहेत. यामुळे भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच भारतासाठी ईराण अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचा देश आहे. चीननंतर भारतच असा देश आहे जो ईराणकडून सर्वाधिक तेल खरेदी करतो. त्यामुळे अमेरिका-ईराणच्या युद्धाचा थेट परिणाम भारतावर होईल. भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर आणि जीवनावश्यक हा परिणाम लगेचच दिसून येऊ शकतो.

 

विमान उड्डाणांचे मार्ग बदलण्याचे आदेश

 

भारताने आपल्या विमानांना इराक, इराण आणि आखाती देशांवरून उड्डाणे टाळण्यासंदर्भात निर्देश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. इराकमधील दुतावास आणि इरबील प्रांतातील कांऊन्सलेटचे काम सुरूच राहणार असल्याचे भारताच्या परराष्ट्र विभागाने स्पष्ट केले आहे. इराकमधील इरबील प्रांतातील अमेरिकेच्या तळावर इराणने रॉकेट हल्ला केला. त्यामुळे तेथील परिस्थिती बिघडण्याची शक्यता आहे. मात्र, तेथील कांऊन्सलेट भारतीयांसाठी काम करत राहणार आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

 
@@AUTHORINFO_V1@@