कामगार संघटनांचा ‘भारत बंद’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

BHARAT_1  H x W



मुंबई : कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी एकत्र येत उद्या बुधवारी दि. ८ जानेवारी रोजी ‘भारत बंद’ ची हाक दिली आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यामधील कर्मचारी ‘भारत बंद’ आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत.

ऑल इंडिया बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार सहा बँक युनियन्स उद्याच्या
‘भारत बंद’ मध्ये सहभागी होत असून यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल. बँक शाखा आणि एटीएम सेवेला ‘भारत बंद’ चा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, काही अपवाद वगळल्यास खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहील. ‘भारत बंद’ चा फारसा परिणाम होणार नाही, असे ’एसबीआय’ने म्हटले आहे. ‘भारत बंद’ मध्ये सहभागी होणार्‍या बँक कर्मचारी संघटनांमध्ये ’एसबीआय’च्या कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असा दावा ’एसबीआय’ने केला आहे.

@@AUTHORINFO_V1@@