जेनयु विद्यार्थी संघटना अध्यक्ष आइशी घोषसह, १९ विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


aaishi ghosh_1  



नवी दिल्ली : जेएनयू विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आइशी घोष आणि अन्य १९ विद्यार्थ्यांविरूद्ध दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या विद्यार्थ्यांनी ४ जानेवारीला सर्व्हर रूममध्ये तोडफोड आणि सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ जानेवारीलाच जेएनयू प्रशासनाने हा गुन्हा पोलिसात दाखल केला होता.


विद्यार्थ्यांनी सर्व्हर बंद केल्याने हिवाळी सत्राची नोंदणी थांबली होती


शुक्रवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात वसतिगृह फी वाढीस विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे सर्व्हर बंद केले. सर्व्हर बंद होताच विद्यापीठाच्या कामकाजासह शीतकालीन सेमेस्टरची नोंदणीही बंद झाली. दुसरीकडे
, विद्यापीठ प्रशासनाने सांगितले की, सर्व्हर बंद करणाऱ्या विद्यार्थ्यांविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.


जेएनयू प्रशासनाच्या म्हणण्यानुसार
, शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांचा चेहरा झाकलेला एक गट माहिती केंद्राच्या खोलीत गेला आणि त्यांनी वीजपुरवठा खंडित केला. त्याचबरोबर सर्व्हर देखील बंद झाले. सर्व्हर बंद झाल्यामुळे नोंदणी थांबली. सर्व विद्यार्थ्यांनी हिवाळ्याच्या सत्रात पुन्हा नोंदणी करणे बंधनकारक आहे. यासाठी शेवटची तारीख ५ जानेवारीपर्यंत होती. नोंदणी न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात येतात.

@@AUTHORINFO_V1@@