जेएनयू संदर्भातील आझाद मैदानावरील आंदोलन मागे ; विद्यार्थ्यांचा निर्णय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरात आंदोलने सुरू आहेत. मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथेही विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. मात्र, या आंदोलनकर्त्यांना गेट वे ऑफ इंडिया येथून हलवण्यात आले होते. सामान्य नागरिक आणि पर्यटकांना अडथळा होत असल्याचे कारण देत आंदोलकांवर ही कारवाई करण्यात आली. मात्र, आता विद्यार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, आता आझाद मैदानातील आंदोलन मागे घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय घेतला आहे. 

 

अधिक माहितीसाठी हेही वाचा...

 

आम्ही कोणत्याही आंदोलकाला ताब्यात घेतलं नसून त्यांना केवळ आझाद मैदानात हलवण्यात आल्याची प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी जेएनयूमध्ये जी घटना घडली त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. सामान्य मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका, असे आम्ही या आंदोलनाच्या आयोजकांना सांगितले होते. तसेच त्यांनीही याबाबत आश्वासन दिले होते. या आंदोलनात अनेक जण जोडले गेले. त्यामुळे गेटवे ऑफ इंडिया परिसरात येणाऱ्या लोकांना त्रास झाला,” असेही त्यांनी नमूद केले.

@@AUTHORINFO_V1@@