मन हेलावून टाकणारा ‘शिकारा’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

shikara_1  H x



दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा
यांच्या आगामी चित्रपट 'शिकारा'चा ट्रेलर मंगळवारी प्रदर्शित करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु होती. संवेदनशील माणसाच्या अंगावर शहारा आणणारा हा ट्रेलर अखेर आज प्रदर्शित झाला.


शेरोशायरी
ने सुरु होणारा हा ट्रेलर मात्र नंतर परिस्थितीचे उग्र रूप दाखविण्यास सुरुवात करतो. अचानक बाहेरून गोंधळाचा आवाज येतो. जाळणारी घरं, लोकांचा आक्रोश आणि सर्वत्र दहशतीचे वातावरण दिसते. काश्मिरी पंडितांना पाकिस्तानातून जाण्यास सांगितलले जातेय. चित्रपटाचा हा ट्रेलर हा अंगावर काटा उभा करणारा आहे.




१९९० साली लाखो काश्मिरी पंडितांना एका रात्रीत बेघर केले गेले. तीस वर्षांनंतरही त्यांच्या जगण्यात फार काही बदल झालेला नाही. आजही ते निर्वासितांचे जीवन जगत आहेत. या मुद्यावर विधु विनोद चोप्रा आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकत आहेत.

 


सादिया आणि आदिल खान
ही नवीन जोडी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सादिया शांतीची भूमिका साकारत आहे तर आदिल शीवची. हम आऐंगे अपने वतन वाजीत साहब.... और यही पे दिल लगाऐंगे... यही पर मरेंगे... यही के पानी में हमारी या डायलॉगने ट्रेलरचा शेवट करण्यात आला आहे.


या
चित्रपटाला ए. आर. रेहमान यांचे पार्श्वसंगीत लाभले आहे. २०२०च्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एका ‘शिकारा’ ७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@