हा तर केवळ मूर्खपणा ; या निर्णयावर गंभीरची प्रतिक्रिया

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात कसोटी क्रिकेट म्हणजे प्रत्येक खेळाडूच्या क्षमतेची कसोटी लावळणारा क्रिकेटचा एक अत्यंत महत्वाचा फॉरमॅट मनाला जातो. सध्या टी-२०च्या झटपट क्रिकेटमुळे कुठेतरी कसोटी क्रिकेटला याचा फटका बसत आहे. यासाठी कसोटी क्रिकेटमध्ये अनेक प्रयोग केले जात असल्याचेदेखील पहिले आहे. डे-नाईट कसोटी हा त्यातलाच एक प्रकार. आता क्रिकेटची सर्वोच्च परिषद असलेली आयसीसी कसोटी क्रिकेट सामन्यांचा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे. आता कसोटी सामना ५ दिवसांचा कालावधी आता ४ दिवसांवर करण्याचा विचार करत आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळातून टीकेचा सूर उमटत असून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही यावर सडकून टीका केली आहे.

 

गौतम गंभीर यांने मत व्यक्त करताना सांगितले की, "चार-दिवसाच्या कसोटी सामन्याची कल्पना हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. ही कल्पना अजिबात अंमलात आणली जाऊ नये. ही कल्पना म्हणजे अनिर्णित सामन्यांना निमंत्रण असेल. फिरकीपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा कमी होईल." पुढे त्यांने असे सांगितले की, "अनेकांनी कसोटी क्रिकेट जगवण्यासाठी विविध कल्पना सांगितल्या. पण मला असे वाटते की चॅम्पियन खेळाडूंची कमतरता आणि खेळपट्टीचा कमी झालेला जिवंतपणा यामुळे कसोटी क्रिकेट अडचणीत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे."

@@AUTHORINFO_V1@@