मुंब्य्रात १३ गोदामांना आग ; गोदामे जाळून खाक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास मुंब्र्याजवळील शिळ फाटा येथे खान कंपाउंड मधील गोडाऊनला आग लागली. त्यातील काही गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि भंगार होते, त्यामुळे आगीने मोठा पेट घेतला. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनचे पथक आणि ठाणे अग्नीशमन दल प्रयत्न करत होते.

 

या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. या घटनेत १३ गोडाऊन जळून खाक झाले. ३ अग्नीशमन बंब, दोन बचाव वाहन, तीन पाण्याचे टँकर, दोन पाण्याच्या मोठ्या टँकरच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू होते.

@@AUTHORINFO_V1@@