नाराज वडेट्टीवारांची मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीला दांडी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0

 


मुंबई : महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर बऱ्याच दिवसांनी मंत्र्यांमध्ये खातेवाटप करण्यात आले. मात्र, त्यानंतर कामापेक्षा पक्षांतर्गत नाराजीच्याच बातम्या जास्त येऊ लागल्या आहेत. सत्तार आणि इतर काही नेत्यांच्या नाराजी नाट्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार नाराज असल्याची चर्चा आहे. वडेट्टीवार यांना दिलेले खाते दुय्यम असल्याचे सांगत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. महाविकास आघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित राहून त्यांनी यावर शिक्कामोर्तबच केले आहे.

 
 

विजय वडेट्टीवार यांच्याकडे ‘इतर मागासवर्ग, सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भूकंप पुनर्वसन’ या मंत्रायाची धुरा सोपवण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेसचा ओबीसी चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यामुळे त्यांच्याकडे विशेष मागास प्रवर्ग कल्याणाची जबाबदारी पक्षाकडून सोपवण्यात आली. परंतु, वडेट्टीवार मात्र या खात्यापासून नाराज असल्याचे सांगतिले जात आहे. यावर एका पत्रकाराने प्रश्न विचारले असता 'आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,' अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. यावरून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट झाली होती.

@@AUTHORINFO_V1@@