‘संघकाया फाऊंडेशन’ आयोजित बौद्ध महासभा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

page8_1  H x W:



मुंबई : तथागत गौतम बुद्धाच्या विचारांना पुढे नेण्यासाठी ‘संघकाया फाऊंडेशन’ कार्य करते. धम्माचा प्रसार व्हावा, यासाठी फाऊंडेशनने या आधी गुजरातला आणि थायलंड येथेही परिषद घेतली आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्धांच्या विचारांनी समाजात समानता व शांतता नांदावी यासाठी ‘संघकाया फाऊंडेशन’ व अध्यक्ष भन्ते प्रशिलरत्न यांनी अनेक बौद्धविहारांना थायलंडच्या बुद्धमूर्ती दान केल्या आहेत. दि. १२ जानेवारी रोजी ‘संघकाया फाऊंडेशन’च्या माध्यमातून बौद्ध महासभेचे आयोजन अहमदाबाद येथील गुजरात विद्यापीठाच्या सिनेट हॉलमध्ये कार्यक्रमात भिक्खू संघाला चीवरदान करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी भन्ते प्रशिलरत्न व ‘संघकाया फाऊंडेशन’ची संपूर्ण टीम महाराष्ट्रभर काम करत आहे. मुंबईचे काम योजना ठोकळे व इतर सहकारी करीत आहेत. या कार्यक्रमामध्ये जवळ जवळ दहा हजार लोक उपस्थित राहणार आहेत. बौद्ध धम्मामध्ये दानाला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार भिक्खूंना चीवरदान करणे महापुण्याचे काम आहे. तसेच बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२८व्या जयंतीनिमित्त १२८ बौद्ध भिक्खूंना चीवरदान करण्याचे योजिले आहे. तरी सर्व बौद्ध उपासक आणि उपासिकांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

@@AUTHORINFO_V1@@