राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निशेदहार्थ मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी निर्दशने करण्यात आली. यावेळी गेट वे ऑफ इंडिया येथेदेखील आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचा सहभाग होता. यामध्ये राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचादेखील सहभाग या आंदोलनामध्ये होता. जितेंद्र आव्हाड यांच्या सहभागावर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
 
 

गेट वे ऑफ इंडियाजवळ झालेल्या आंदोलनामध्ये काश्मीर को चाहिए आझादीअशा घोषणा देण्यात आल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता. किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध आणि देशविरोधी काश्मीर को चाहिए आझादीअशा घोषणा देण्यात आल्या. हे आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. तरीही हे आंदोलन करण्यात आले असून, मंत्र्यांविरोधात कारवाई करण्यात यावी,” अशी मागणी सोमय्या यांनी तक्रारीत केली होती.

@@AUTHORINFO_V1@@