सर्जनशीलतेच्या नगरीत...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2020
Total Views |

page8_1  H x W:



तरुणांमधील सर्जनशीलता आणि उद्योजकता यांची जोपासना करून त्याद्वारे रोजगारनिर्मिती व्हावी, यादृष्टीने मोदी सरकार ‘स्टार्टअप इंडिया’, ‘स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन’ यांसारख्या अनेक योजना राबवत आहे. यातीलच एक पाऊल म्हणजे ‘नीती आयोगा’चे ‘अटल इनोव्हेशन मिशन!’ भारत सरकारच्या या योजनेंतर्गत मुंबईजवळील भाईंदरमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संकुलात ‘अटल प्रतिभा पोषण केंद्रा’ची स्थापना करण्यात आली आहे. हे केंद्रकृषी, माहिती संचार तंत्रज्ञान (शैक्षणिक व आरोग्य) क्षेत्र व सामाजिक परिवर्तनात सहभागी असणार्‍या स्टार्टअप्सना त्यांचे उद्योग वृद्धिंगत करण्यास सहकार्य करते.


या केंद्राचे उद्घाटन २० जानेवारी
, २०१९ रोजी डॉ. राजीवकुमार (उपाध्यक्ष, नीती आयोग), रमणनरामनाथन (मिशन संचालक, अटल इनोव्हेशन मिशन, नीती आयोग) आणि डॉ. विनय सहस्रबुद्धे (खासदार, राज्यसभा) यांच्या उपस्थितीत झाले. केंद्राच्या संचालन मंडळात रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे महासंचालक रवींद्र साठे, कार्यकारी प्रमुख (प्रशासन - प्रकल्प) वी पोखरणा, आमदार मंगलप्रभात लोढा आणि जय मृग यांचा समावेश असून मुख्य कार्यकारी अधिकारी उदय वांकावाला यांचा स्टार्टअप्स क्षेत्रातील अनुभव केंद्राच्या उभारणीस निश्चित दिशा देत आहे.


४ आणि ५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या एका समारंभात निवड प्रक्रियेतून पुढे आलेल्या बारा स्टार्टअप्सच्या प्रथम गटाला केंद्राच्या इन्क्युबेशन कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले
. हे स्टार्टअप्स मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, जव्हार, नाशिक, कोल्हापूर आणि बंगळुरू या शहरांतले असून त्यांच्या तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवसायांचा प्रभाव मात्र देशव्यापी आहे. या उद्योजकांच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी तसेच ‘भगेरिया इंडस्ट्रीज’चे सर्वेसर्वा सुरेश भगेरिया उपस्थित होते.


पर्यटनातून रोजगारनिर्मिती करून आदिवासी भागातून होणारे स्थलांतर थांबवणे
, रंगकामासारख्या पारंपरिक व्यवसायात नवे तंत्र आणून कामगारांना संघटित करणे, कौशल्यविकासातून महिलांचे सबलीकरण आणि व्यवसायांमध्ये सहभाग वाढवणे, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीक्षेत्राची पुनरुभारणी करणे, उपलब्ध तंत्रयुक्तसाधने व सुविधा खेडोपाडी पोहोचवणे, नवनवीन संशोधनांची माहिती उपलब्ध करून वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची क्षमता बांधणी करणे, वैभवशाली परंपरा असलेले पण लोप पावत चाललेले कलाकुसरीचे व्यवसाय आणि कारागीर यांच्या सक्षमीकरणासाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करणे, आपत्तीव्यवस्थापनासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्यासहाय्याने अचूक विश्लेषण करणे अशा विविध विषयांवर काम करणार्‍या स्टार्टअप्सचा समावेश या गटात आहे.


केंद्राद्वारे निवडझालेल्या स्टार्टअप्सना दोन वर्षांसाठी वेगवेगळ्या माध्यमांतून आधार दिला जातो
. यामध्ये त्वरित आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत टिकाव धरण्यासाठी आणि व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येक स्टार्टअपला दोन-तीन तज्ज्ञमार्गदर्शकांशी जोडून दिले जाते. तसेच इन्क्युबेशन कालावधीत नेतृत्वसंवर्धन, विपणनशास्त्र, व्यवसायवृद्धीसाठीची सूत्र, उत्तम सादरीकरणाच्या क्लृप्त्या, तणावमुक्तीसाठी मार्गदर्शन, वित्तव्यवस्थापनाचे प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील कार्यशाळा आयोजित केल्या जातात. शिवाय निधी अथवा गुंतवणूक मिळण्याच्या दृष्टीने अनेक पर्याय तसेच वेगवेगळ्या मंचांवर सादरीकरण करून निरनिराळ्या क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींशी जोडून घेण्याच्या संधीही उपलब्ध करून दिल्या जातात. हे स्टार्टअप्स रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संकुलातील केंद्राच्या विभागून दिलेल्या सामायिक कार्यालयीन जागेतून आपले उद्योग चालवू शकतात. स्टार्टअप्सना कृषी क्षेत्रातील अनुभवी उद्योजकांशी संवाद साधता यावा, यासाठी केंद्राने ’कृषीसंवेदना’ हा एक उपक्रम सुरू केला आहे. प्रत्यक्ष भेटीतून या उद्योजकांचे काम पाहता यावे आणि त्यांच्या अनुभवातून शिकता यावे, हा मुख्य हेतू आहे. यासंदर्भातली माहिती केंद्राच्या सोशल मीडियावर वेळोवेळी प्रसिद्ध केली जाते.


तसेच स्टार्टअप्सचे नावीन्यपूर्ण काम लोकप्रतिनिधी
, सरकारी अधिकारी आणि विविध क्षेत्रांतील ख्यातनाम व्यक्तींसमोर यावे, यासाठी केंद्रातर्फे दि. २२ जून २०१९ रोजी ‘न्यू इंडिया स्टार्टअप कॉन्क्लेव्ह’ या एकदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पुरुषोत्तम रुपाला (केंद्रीय कृषी व किसान कल्याण राज्यमंत्री, भारत सरकार), प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘कनेक्ट, शेअर आणि ग्रो’ या त्रिसूत्रीवर आधारित असणार्‍या या परिषदेत स्टार्टअप्स, शैक्षणिकतज्ज्ञ, गुंतवणूकदार, संबंधित विभागांचे सरकारी अधिकारी, ज्येष्ठ मार्गदर्शक, खाजगी क्षेत्रातले मान्यवर, उद्योजक तसेच विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते.


आगामी काळात याच परिषदेचे दुसरे पर्व मुंबईमध्ये आयोजित केले जाणार आहे
. दि. ८ फेब्रुवारी, २०२० रोजी होणार्‍या ’न्यू इंडिया स्टार्टअप कॉन्क्लेव्ह २.ज’ मध्ये नीती आयोगाच्या ’आकांक्षी जिल्हाकार्यक्रम’ (Transformation of Aspirational Districts Programme) विकासाशी निगडित असणार्‍या स्टार्टअप्सना सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. यात कृषी, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांच्या परिवर्तनात सहभागी स्टार्टअप्सचा समावेश असेल. निवडप्रक्रियेत नावीन्य, तंत्रज्ञानाचा वापर, प्रतिकृतीयोग्यता, मोठ्या परिक्षेत्रावरील प्रत्यक्ष उपयोगिता आणि उद्योगवृद्धीची संभाव्यता असे निकष लावले जातील. ’आकांक्षी जिल्हा कार्यक्रम’ संबंधित सरकारी तसेच खाजगी क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती आणि सहभाग यांत अपेक्षित आहे. अशा प्रकारे नीती आयोग संकल्पित ’नवाभारत’ निर्माण करण्याच्या दिशेने रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल प्रतिभा पोषण केंद्र हे अतिशय सक्षम पावश्रश उचलत आहे.

अधिक माहितीसाठी केंद्राच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. www.aicarmp.org

- पल्लवी रामाणे

@@AUTHORINFO_V1@@