नवनिर्वाचित शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदवी 'बोगस' ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारने अखेर बऱ्याच दिवसांनंतर मंत्र्यांना खातेवाटप केले. मात्र, त्यानंतरही ठाकरे सरकार टीकेचे धनी ठरत आहे. पक्षांतर्गत नाराजी, दिलेल्या पदांवर खुश नसलेले मंत्री अशातच आता नवे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पदवीवरून प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे. त्यांनीं घेतलेली ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ही पदवी सरकारी मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून घेतली आहे.

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी खातेवाटप जाहीर केले. यामध्ये शिवसेनेचे सामंत यांच्यावर उच्च व तंत्रशिक्षण खात्याचा पदभार देण्यात आला आहे. त्यांनी पुण्यातील ज्ञानेश्वर विद्यापीठातून ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला असल्याचे निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. ज्ञानेश्वर विद्यापीठ हे कुठल्याच प्रकारची सरकारी मान्यता नसलेले बोगस विद्यापीठ असल्याचा आरोप पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते डॉक्टर अभिषेक हरदास यांनी केला. त्यामुळे त्यांच्या पदवीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावर आता शिवसेनेसहित राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काय उत्तर याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

@@AUTHORINFO_V1@@