ऑस्ट्रेलियातील होरपळलेल्या प्राण्यांसाठी या क्रिकेटपटूची मदत

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |

shane_1  H x W:



सिडनी : ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील भीषण आग गेल्या ४ महिन्यांपासून धगधगत आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. या आगीने आतापर्यंत ५० कोटीहून अधिक प्राण्यांचा जीव घेतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील जीवन पुर्वपदावर येण्यासाठी जगभरातून मदत केली जात आहे. यातच आता मदतीसाठी ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने हात पुढे सरसावला आहे. हा प्रसिद्ध गोलंदाज प्राण्यांच्या मदतीसाठी आपल्या आवडत्या टोपीचा लिलाव करणार आहे.


ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्न आपली आवडती टोपी विकणार आहे. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत १८ लोकांचा आणि जवळपास ५१ कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. किनाऱ्याकडे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे आतापर्यंत २०० हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. आपल्या देशाचा कारभार पूर्वपदावर आणण्यासाठी शेन वॉर्नने हे पाऊल उचलले आहे.


शेन वॉर्नच्या आवडत्या अशा ग्रीन कॅपला मागणीही जास्त आहे. शेन
ने त्याच्या १४५ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत ही टोपी परिधान केली होती आणि आणि ही टोपी घालून त्याने आतापर्यंत ७०८ झेल घेतले आहेत, त्यामुळे ही टोपी त्याच्यासाठी लकी आहे. या टोपीवर वॉर्नची स्वाक्षरीही मिळणार आहे. या टोपीच्या ऑनलाइन लिलावामधून येणारी रक्कम वॉर्न बुशफायर अपीलला दान करणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@