संवेदनशीलता भाग-८

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


जी गोष्ट टीबीच्या लसीची आहे, तीच कांजिण्या, गोवर, रुबेला इत्यादी लसींची असते. मग असे का होते? लसीकरण केल्यावरही हे आजार होतात. याचे मुख्य कारण म्हणजे, माणसाची संवेदनशीलता (Susceptibility). याच संवेदनशीलतेला विचारात न घेता जेव्हा सरसकट अशी औषधे दिली जातात तेव्हा माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत जाते.


रुग्णाची संवेदनशीलता ही वेगवेगळ्या ऋतूत किंवा वेगळ्या वेळेत व वेगळ्या वातावरणात वेगवेगळी असू शकते, तसेच एकाच वातावरणात व वेळेत राहणार्‍या वेगळ्या रुग्णांमध्ये पूर्णपणे भिन्न असू शकते. संवेदनशीलतेचा अभ्यास न करता औषधे दिली गेली तर मात्र शरीराची अतोनात हानी होते. ज्याला साध्या भाषेत आपण 'औषधाचे दुष्परिणाम' म्हणजेच 'साईड इफेक्ट्स' असे म्हणतो. प्राध्यापक जेम्स इविंग हे कॉर्नेल विद्यापीठातील एक प्रसिद्ध संशोधक होते. त्यांनी संवदेनशीलता व रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) याबद्दल त्यांचे संशोधन व अनुुमान लिहून ठेवले आहे. त्यांच्या संशोधनानुसार -

 

माणसाच्या शरीरात एखाद्या रोगाविरोधात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी लसीकरण केले जाते. एक प्रकारची विशेष लस शरीरात टोचली जाते. या लसीने जीवाणू तर मरतात. परंतु, या लसीच्या प्रतिकारार्थ हे जीवाणूसुद्धा काही विषारी द्रव्ये शरीरात सोडत असतात. त्यामुळे वरकरणी जरी रुग्णाच्या शरीरात जीवाणू दिसत नसले तरी त्यांची विषारी रसायने शरीरावर विपरीत कार्य करून संसर्ग कायम ठेवतात. याचाच परिणाम म्हणजे तपासणीमध्ये कुठेही जीवाणू आढळत नाहीत. परंतु, तरीही प्रकृती गंभीर होते व खालावत जाते. अजून एक उदाहरण देता येईल, जसे भारतात जन्म झालेल्या प्रत्येक बालकाला जन्मतःच बीसीजीची लस दिली जाते. ही लस बाळाचे क्षयरोगापासून रक्षण व्हावे म्हणून दिली जाते. प्रत्येक रुग्णालयात किंवा सरकारी दवाखान्यात ही लस मोफत दिली जाते. इतके सर्व केल्यानंतरही आपल्याला असे आढळून येते की, भारतात लोकांना सर्वात जास्त होणारा आजार म्हणजे क्षयरोग हा आहे. मग इथे आपल्याला असा प्रश्न पडतो की, जर प्रत्येक बालक जन्मत:च बीसीजीची लस घेते तर मग त्याला टीबी का होतो?

 

जी गोष्ट टीबीच्या लसीची आहे, तीच कांजिण्या, गोवर, रुबेला इत्यादी लसींची असते. मग असे का होते? लसीकरण केल्यावरही हे आजार होतात. याचे मुख्य कारण म्हणजे, माणसाची संवेदनशीलता (Susceptibility). याच संवेदनशीलतेला विचारात न घेता जेव्हा सरसकट अशी औषधे दिली जातात तेव्हा माणसाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होत जाते. प्राध्यापक इपिंग यांनी या रोगप्रतिकारक शक्ती व संवेदनशीलतेचा त्यावर होणारा परिणाम तपासण्यासाठी अनेक प्राण्यांवरही प्रयोग केले. उदा. ससा या प्राण्याच्या रक्तात प्रथमपासूनच टायफॉईड या आजाराच्या जीवाणूंच्या प्रतिकारार्थ नैसर्गिक प्रतिकारशक्ती असते. परंतु, जर या सशाला लस टोचली तर या लसीमुळे त्याची ही नैसर्गिक प्रतिकारशक्ती लोप पावते व त्याला त्याच प्रकारच्या जीवाणूंचा संसर्ग होऊन ससा मरण पावतो.हे प्रयोग केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की, या अतिप्रकारच्या लसीकरणामुळे मानवाच्या शरीरातीलही रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होत जाते व माणूस सतत आजारी पडतो. म्हणूनच आपल्या सर्वांना एक प्रश्न नेहमी पडतो की, जगात इतके संशोधन झाले आहे. अनेक आधुनिक औषधे तयार झाली आहेत. परंतु, जगातील रोग कमी झाले आहेत का? पुढील भागात आपण याची माहिती घेऊया.

 

- डॉ. मंदार पाटकर

@@AUTHORINFO_V1@@