एर्दोगान यांचे शल्य आणि मुस्लीम

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


जेव्हा इराक आणि सीरियामध्ये इसिस या दहशतवादी इस्लामी संघटनेने भीषण हिंसाचार व निरापराध्यांचे हत्याकांड सुरू केले होते, तेव्हा या दोन्ही देशांतील मुस्लिमांनी थेट पश्चिमी ख्रिश्चन देशात पलायन केले. कोट्यवधी मुस्लीम हे ख्रिश्चनांच्या आश्रयाला गेलेत पण जगातील ५६ मुस्लीम देशांपैकी एकाही देशाने त्यांना त्यांच्या देशात आश्रय दिला नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल.


इराक आणि सीरिया या देशांमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. इसिससारख्या आणि तालिबानसारख्या इस्लामी अतिरेक्यांविरुद्ध सुरू असलेले तेथील युद्ध आता मुस्लिमांचे अंतर्गत युद्ध ठरू लागले आहे. नुकतीच मलेशियामध्ये मुस्लीम देशांची एक परिषद झाली. त्यात तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी एक व्यथा मांडली. पण, इतर मुस्लीम देशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे मुस्लिमांच्या समस्येकडे दुर्लक्ष करणाऱ्या देशांमध्ये पाकिस्तान आणि सौदी अरब या मुस्लीम देशांचा प्रामुख्याने समावेश आहे. भारतातील मुस्लिमांच्या स्थितीबाबत ओरडणाऱ्या पाकिस्तानला इतर मुस्लीम देशातील मुस्लिमांच्या समस्या फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. त्यावरून भारतात सुखेनैव जीवन जगणाऱ्या मुस्लिमांनी बोध घ्यायला हवा. पण, जोवर त्यांच्यावर बांगलादेशातील मुस्लिमांसारखी स्थिती येणार नाही, तोवर भारतातील मुस्लिमांची पाकबाबतची भावना बदलणार नाही, असे वाटते. इराक व सीरियामधील अनेक मुस्लीम हे तुर्कीमध्ये आश्रयाला आले आहेत व हा आकडा ३५ लाखांच्या वर जात आहे. या सर्व लोकांच्या राहण्यासाठी तुर्की सरकारला जो खर्च येतो, तो इतर मुस्लीम देशांनी द्यावा किंवा यात मदत करावी, असे एर्दोगान यांनी त्या मुस्लीम परिषदेत आवाहन केले. पण, त्या परिषदेतील सर्व मुस्लीम देशांनी एर्दोगान यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केले, असे एर्दोगान यांनीच नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे. शिवाय तुर्कीच्या आश्रयाला आलेल्या या मुस्लिमांनी त्या देशातही कायदा तोडण्याचे काम चालविले आहे, असाही एर्दोगान यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे कोणत्याच मुस्लीम देशाच्या प्रमुखाने ही बाब गांभीर्याने घेतली नाही.

 

जेव्हा इराक आणि सीरियामध्ये इसिस या दहशतवादी इस्लामी संघटनेने भीषण हिंसाचार व निरापराध्यांचे हत्याकांड सुरू केले होते, तेव्हा या दोन्ही देशांतील मुस्लिमांनी थेट पश्चिमी ख्रिश्चन देशात पलायन केले. कोट्यवधी मुस्लीम हे ख्रिश्चनांच्या आश्रयाला गेलेत पण जगातील ५६ मुस्लीम देशांपैकी एकाही देशाने त्यांना त्यांच्या देशात आश्रय दिला नाही, ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. इराक आणि सीरिया देशातील हिंसाचारग्रस्त मुस्लीम हे इराण, सौदी अरेबिया, ओमान, दुबई आदी धनाढ्य मुस्लीम देशांत का गेले नाहीत, तर जवळपास सर्वच मुस्लीम देशांनी त्यांना त्यांच्या देशात प्रवेश नाकारला आहे. अफगाण, इराक, सीरिया, पाकिस्तान आदी हिंसाचारी देशातील मुस्लिमांना जर आपल्या देशात आश्रय दिला, तर ते आपल्याही देशात हिंसाचार करतील, येथील कायदा तोडतील आणि दहशतवादी कारवाया करतील व त्यांच्यामुळे देशात गृहयुद्ध होईल, अशी साधार भीती इराण व सौदी अरेबियासह अनेक देशांनी व्यक्त करून मुस्लिमांना आश्रय नाकारला आहे, हे वास्तव आहे. इतकेच नव्हे तर हेच आश्रयाला आलेले लोक नंतर त्यांच्या देशात परत जाणार नाहीत आणि ते भार म्हणून येथेच राहतील, अशी भीती इराण, सौदी आदी देशांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांची चिंता अधिक बोलकी आहे. यातून भारतातील मुस्लीमधार्जिण्या राजकीय पक्षांनी आणि तशाच प्रवृत्तीच्या कुबुद्धीवाद्यांनी धडा घेण्याची वेळ आली आहे.

 

- मधुसूदन कुळकर्णी

@@AUTHORINFO_V1@@