माझ्या राजीनाम्याची अफवा पक्षातील नेत्यांचीच पसरवली : सत्तार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2020
Total Views |
Abdul Sattar _1 &nbs
 

उद्धव ठाकरे-अब्दुल सत्तार यांच्यात वीस मिनिटे चर्चा


मुंबई : राजीनामा आणि नाराजीनाट्यानंतर शिवसेना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी 'मातोश्री'वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत वीस मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत माझा राजीनाम्याची केवळ अफवा पसरवली होती, असे मत सत्तार यांनी व्यक्त केले आहे.

 

"माझ्याबाबत अफवा पसरवण्यात आली होती. माझी कोणतीही नाराजी नाही आहे. मी प्रत्येक गोष्ट त्यांना सविस्तर सांगितलेली आहे. याची शहानिशा ते करतील. सोमवार, दि. ६ जानेवारी रोजी पुन्हा मी पाच वाजता मुख्यमंत्र्यांना भेटेन औरंगाबाद जिल्हापरिषद निवडणुकीत शिवसेनेची मते फुटली नाहीत, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने काय केले हे तपासून बघावे." असे सत्तार म्हणाले.

 

कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्ता नाराज असल्याचे बोलले जात होते. यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचे शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होते. राजीनाट्यामुळे खातेवाटपापूर्वीच शिवसेनेला मोठा धक्का बसला. अब्दुल सत्तार आता आपल्या आमदारकीचा सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या देखील चर्चा होत्या.

@@AUTHORINFO_V1@@