भारत- श्रीलंका मालिका : सामना पाहायचाय मग 'या' अटी पाळा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : देशभर नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून कुठे विरोधात तर कुठे समर्थनार्थ आंदोलने होत आहेत. याचे सावट आता क्रिकेटवरही पाहायला मिळत आहे. येत्या रविवारी ५ तारखेला गुवाहाटीमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पहिला टी-२० सामना होणार आहे. या पार्श्वभूमीवर हा सामना बघायला जाणाऱ्या प्रेक्षकांना सोबत फक्त पैसे, मोबाईल आणि गाडीची चावी घेऊन जाण्याची परवानगी असणार आहे. इतर वस्तू स्टेडिअममध्ये घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

 

प्रेक्षकांना आपल्यासोबत कोणत्याही प्रकारचे पोस्टर किंवा बॅनर स्टेडियमध्ये घेऊन जाता येणार नाही. याशिवाय प्लेकार्ड्सही सोबत असलेले चालणार नाहीत. एवढेच नव्हे तर साधा ‘मार्कर’ देखील घेऊन जाता येणार नाही. गेल्या काही दिवसांपासून आसाममधील सामाजिक आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून आसाममध्ये रणकंदन माजले होते. येथील राजकीय आणि सामाजिक घडामोडी बघता या सामन्यासाठी पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

@@AUTHORINFO_V1@@