धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या 'त्या' जागी पोटनिवडणूक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |
ec _1  H x W: 0

विधानपरिषदेच्या एका जागेसाठी २४ जानेवारीला पोटनिवडणूक



नवी दिल्ली : धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी २४ जानेवारी २०२० रोजी पोटनिवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. मागीलवर्षी २४ ऑक्टोबरला विधानपरिषदेचे आमदार धनंजय मुंडे हे विधानसभेवर निवडून गेल्याने वरिष्ठ सदनाची ही जागा रिक्त झाली. या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने शुक्रवारी विधानपरिषदेच्या या रिक्त जागेसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

 


आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जानेवारीला निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १४ जानेवारी असून १५ जानेवारीला उमेदवारी अर्जांची छानणी होईल. १७ जानेवारीपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. तर २४ फेब्रुवारीला मतमोजणी पार पडून निकाल जाहीर होईल. या विधानपरिषद सदस्यपदाची कालमर्यादा जुलै २०२२ पर्यंत आहे.



@@AUTHORINFO_V1@@