नवी दिल्ली : पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारा येथे झालेल्या तोडफोडीचा भारताकडून तीव्र निषेध केला गेला. भारतात सर्वत्र या घटनेचा निषेध होत असताना मात्र काँग्रेसकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री हरसिमरतकौर बादल यांनी राहुल गांधींवर टीका केली. त्यांनी ट्विट करत पाकिस्तान व राहुल गांधींचा निषेध केला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,"कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी गुरुद्वारा नानकसाहिबच्या दगडफेकीचा निषेध करण्यास नकार दिल्याने आणि पवित्र मंदिराच्या अस्तित्वाला धोका दर्शविल्यास नकार दिल्याने त्यांचा शीखविरोधी चेहरा उघडकीस आला आहे. राहुल गांधी याना नागरिकत्व कायद्यावरून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी ओव्हरटाईम काम करत आहेत, परंतु त्यांना पाकिस्तानकडून अत्याचारांवर प्रकाश टाकण्यासाठी वेळ नाही." अशा तीव्र शब्दात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली.
Cong leader @RahulGandhi’s refusal to condemn stoning of #GurdwaraNankanaSahib & threat to the very existence of holy shrine reveals his anti-Sikh face. Rahul working overtime to mislead ppl on #CAA but has no time to take on Pak & expose atrocities it's committing against Sikhs. pic.twitter.com/8Hu2iVM9m4
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) January 4, 2020
Persecution of minorities in Pak is a reality. Today’s attack on Gurdwara Sri #NankanaSahib has shown its horrible face. I want to ask @capt_amarinder & @INCIndia how can they oppose PM @narendramodi’s noble humanitarian gesture of giving rights to such persecuted minorities! pic.twitter.com/pTDNjDilzX
— Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) January 3, 2020