पाकिस्तानमध्ये गुरुद्वारावर जमावाकडून दगडफेक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Jan-2020
Total Views |


asf_1  H x W: 0


नवी दिल्ली : पाकिस्तानमधील शिखांचे पवित्रस्थळ ननकाना साहेब गुरुद्वारावर स्थानिक मुस्लीम रहिवासी जमावाने शुक्रवारी दगडफेक केली. या हल्ल्यावर दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने निषेध व्यक्त केला आहे. शीख तरुणीच्या धर्मांतरानंतर ठिणगी पडली आहे. दरम्यान, पाकिस्तानातल्या नानकाना साहिबमधल्या गुरुद्वारामध्ये घडलेल्या गुंडगिरीचा भारताकडून निषेध करण्यात आला आहे.

 

पाकिस्तानमधील या गुरुद्वारामध्ये सध्या २०० शीख राहत आहेत. जमावाने गुरुद्वारावर दगडफेक करत गेट तोडण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांचे नेतृत्व मोहम्मद हसन याने केले असल्याचे डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी सांगितले. डीएसजीएमसी अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी हसनविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांना केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने पत्रक जारी केले असून या हल्ल्याचा निषेध व्यक्त केला आहे. तोडफोड करणाऱ्यावर पाकिस्तान सरकारने कारवाई करावी. तसेच ननकाना साहेब गुरुद्वाराच्या सुरक्षितेसंबधी उपाययोजना करावी, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

@@AUTHORINFO_V1@@